रिझर्व बॅकेचे कायदे सहकार क्षेञाला जाचक : श्रीमंत ना. रामराजे


स्थैर्य,वावरहिरे, दि २:  सहकार क्षेञाने काढलेल्या संस्थात राष्ट्रीयकृत बॅकेत  ज्या लोकांना पंतच नाहि बाकीच्या बॅकेत अशा लोकांना कर्ज देवुन  त्यांचे संसार पुढे करण्याच काम वाघोजीकाकांनी आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातुन केले. असल्याचे प्रतिपादन सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. वावरहिरे ता.माण येथील सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्याने नुतनीकरण  झालेल्या शाखेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख ,माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा फेडरेशनचे प्रकाश पाटील,संस्थेचे चेअरमन सुनिल पोळ,संचालिका निलिमा पोळ, संदिप मांडवे, म्हसवड नगरपालिका उपनगराध्य धनाजीराव माने,पृथ्वीराज राजेमाने, बाळासाहेब सावंत,रमेश कदम,सरपंच चंद्रकांत वाघ उपस्थित होते.पुढे बोलताना रामराजे म्हणाले केंद्र सरकार सहकार क्षेञा तील अनेक कायदे मोडीत काढुन  सहकार क्षेञ मोडखळिस आणत अाहे. अनेक संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.रिझर्व बॅक इतर संस्थाच्या मुळावर उटलेय.आपण कर्जाची नियमित परतफेड करतो परंतु  विजय मल्ला लंडणला तर निरव मोदी कर्ज घेवुन परदेशात फिरत बसलाय आणि आपण त्यांचे कर्ज फेडायचे हा कोणता न्याय? राष्ट्रीयकृत बॅकेत सामान्याचीपत नसल्याने  त्यांनी पतसंस्था व इतर संस्थाकडुन कर्ज घेवुन आपले  कुटुंब व व्यवसाय   उभे केले.परंतु रिझर्व बॅकेचे काही कायदे इतर संस्थाना जाचक  ठरत असल्याने सहकार क्षेञातील संस्था अडचणीत येतील असे भागीत त्यांनी यावेळी केले.जिल्हा बॅकेच्या निवडणुका काहि महिन्याभरावर येवुन ठेपल्यात नेहमीप्रमाणेच जिल्हा बॅकेचा यंदाही माण तालुक्यातुनच कायम जोर दिसतोय  पण यंदा जिल्हा बॅकेवर योग्य  व्यक्तीला पाठवा. आपल्याला बॅक टिकवायची आहे बॅक बंद पाडायची नाही. असा अप्रत्यक्ष  टोला त्यांनी विरोधकांना लगावला.यावेळी प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे,नरेंद्रपाटील आदी मान्यवराची तर सभासदाच्या वतीने विरभद्र कावडे यांनी मनोगत व्यक्त केले. निलिमा पोळ यांनी स्वागत केले.प्रस्थाविकात संस्थेचे अध्यक्ष सुनिल पोळ यांचे संस्थेचा आढावा  घेतला. यावेळी व्हा चेअरमन सुरेशराव इंगळे, संस्थे सर्व शाखेचे शाखाप्रमुख, पदाधिकारी,सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्खेंने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुञसंचालक  सरपंच अमोल काटकर यांनी केले तर आभार संस्थेचे सरव्यवस्थापक  महादेव गोंजारी यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!