रविंद्र ननावरे यांचे विविध क्रीडा प्रकारातील यश कौतुकास्पद : दिलीप मुळीक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । फलटण । राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नाशिक, राज्यस्तरीय ऍथलेटिक्स क्रीडा स्पर्धा कांदिवली (मुंबई), राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बदलापूर (मुंबई) येथे प्राथमिक शिक्षक रविंद्र ननावरे यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असुन आगामी काळामध्ये सुध्दा रविंद्र ननावरे हे यशाची शिखरे गाठतील, असा विश्वास फलटण तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप मुळीक यांनी व्यक्त केला.

शिक्षक संघाचे समर्थक रविंद्र ननावरे यांच्या सत्कार नुकताच फलटण तालुका शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला. त्या वेळी संघाचे अध्यक्ष मुळीक बोलत होते.

यावेळी सातारा जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस व कोळकी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र बोराटे, शिक्षक बॅंकेचे संचालक अनिल शिंदे, बीएड पदवीधर शिक्षक मंचचे जिल्हाध्यक्ष धनाजी पवार, फलटण तालुका शिक्षक संघाचे नेते नवनाथ गावडे, फलटण तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष हणमंतराव चिंचकर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, जिल्हा संघटक नितीन मोहिते, राजेंद्र कदम, विवेक स्वामी, संघटक नामदेवजी गायकवाड, महिला प्रतिनीधी साधना झणझणे, नाईकनवरे, मयूर बनसोडे, उत्तम चोरमले, मिथुन सरतापे, विनोद पिसे, मदने सर उपस्थित होते.

यावेळेस जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे, शिक्षक बॅंकेचे संचालक अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त करुन रविंद्र ननावरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!