दैनिक स्थैर्य | दि. 02 डिसेंबर 2023 | फलटण | राज्यामध्ये बऱ्याच पत्रकार संघटना व त्यांचे अध्यक्ष कार्यरत आहेत. परंतु महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांचे कामकाज हे राज्याला आदर्शवत आहे; असे मत अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांनी व्यक्त केले.
फलटण येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयला अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांनी भेट दिली; त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, सौ. अलका बेडकिहाळ, अहमदनगर पत्रकार संघाचे कार्यकरिणी सदस्य, तथा निशांत दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर, मराठवाडा केसरीचे निवासी संपादक अशोक झोटिंग, दैनिक लोकयुगचे व्यवस्थापक सॉलोमन गायकवाड, साप्ताहिक संतनगर टाइम्सचे संदीप क्षीरसागर, साप्ताहिक लोकांकुरचे भाऊसाहेब जोशी, साप्ताहिक नगरवेधचे देविदास मंडलिक यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना दातीर म्हणाले की; फलटण येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने एक हायस्कुल चालवले जाते ही फार मोठी गोष्ट आहे. पत्रकार हा समाजामध्ये शिक्षणाचे कामकाज करीत असतो. आज संस्थेला दिलेल्या भेटी दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांना नक्कीच आवडले असून अभिमानस्पद गोष्ट आहे.
यावेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापक भीमा जगताप यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालय व महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या कामकाजाची माहिती दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांना प्राचार्य मनीष निंबाळकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर विद्यालयाची दिली.