रविकांत बेलोशे आज वाढदिवस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, बावधन दि. 16 : खुदी कर बुलंद इतना की हर तकदीर से पेहले खुदा खुद बंदे से पुछे बता ‘तेरी रझा क्या है…!अगदी याच सुप्रसिद्ध शेर शी तंतोतंत जीवनप्रवास तुम्ही करत आलात!यातूनच तुम्हाला पत्रकारिता, आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त करता आलं..पत्रकारितेत किती सातत्य असावे हे तुम्ही कृतीतून वेळोवेळी दाखवून दिलं आहेच.

बेलोशेजी,2006 साली,आम्ही पत्रकारितेत अगदीच नवखे असताना पाचगणीत स्वतःची ओळख मिळवू शकलो त्यात तुमच्या मनाच्या मोठेपणाचा अनुल्लेख करणं कृतघ्नपणा होईल…तो काळ वेगळा होता,पण तरीही पत्रकारितेत येणाऱ्या नवागतांना रोखणारेच जास्त होते.आता काळ आणखी बदललाय….आपल्याच नव्हे शेजारच्या शहरात पत्रकार जन्माला येतोय अशी वावडी जरी उठली तरी अनेकांना पोटसुळ उठतो.. आपल्या सातत्यपूर्ण पण बुजऱ्या पत्रकारितेला आपण सर्वांनी सह्याद्रीच्या माध्यमातून गती द्यायला सुरुवात केली.एक नवी टीम पाचगणी मध्ये एकवटली.शहर व परिसराचे अनेक प्रश्न सुटू लागले.राजकीय,सामाजिक क्षेत्रांत पत्रकारांचा दबदबा वाढला..!सहयाद्रीची ही वज्रमूठ आपल्या शांत संयमी नेतृत्वामुळे एकसंघ राहत गेली.

‘हम पांच’  या सह्याद्री च्या या टीम मुळे रविकांतजी आपण आपल्या बुजऱ्या स्वभावात बदल करायला सुरुवात केली.पत्रकारांच्या लेखणीला अन शब्दाला वजन असते याची जाणीव आपल्याला त्याच काळात झाली.या जाणिवेने अनेकांचे प्रश्न सोडवण्याचे काम आपल्या हातून नकळत होत राहिले.काटवली या जन्मभूमी बरोबरच बेलीशी,दापवडी शिंदेवाडी रांजनी वहागाव रुईघर आदी दुर्गम गावात आपल्याच सहकार्याने शैक्षणिक व्यावसायिक प्रश्न सुटले. अनेक दानशूर व्यक्तींना जावली तालुक्यातील या गावात आपले दान देण्याची इच्छा झाली यात आपले प्रेझेन्टेशन महत्वाचे होते.

बेलोशे सरकार,आपल्या लेखणीच्या प्रेमात अनेकजण आहेत.पण,अलीकडच्या काळात समाजभूषण बाळासाहेब भिलारे,राजुशेठ राजपुरे,लक्ष्मी कऱ्हाडकर यांची नावे प्रधान क्रमाने घ्यावी लागतील.भिलारे दादांनी आपल्याला बेलोशे सरकार,अथवा रवी अशी एकेरी हाक मारावी, अन मनमुराद पणे तालुक्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करावे यातच आपला राजकीय अभ्यास अधोरेखित होतो.

अस म्हणतात,पत्रकाराने नाक,कान आणि डोळे कायम उघडे ठेवले पाहिजेत.आपण पिग्मी कलेक्शन च्या माध्यमातून पाचगणी शहरात फिरत असता,तेव्हा नकळत आपण समाजाचा कानोसा घेत असता..आपला हाच कानोसा आपल्याला दररोज शहरातील घडामोडीची माहिती करून देतो..त्याचीही बातमी होऊ शकते,ही कल्पकता आपलीच!त्यातून सुरू झालेली पाचगणी न्यूज आपण अखंडपणे सुरू ठेवली आहे.लोकांची रुची ओळखून आपण विविध विषयांवर व्यापक लिखाण केले आहे.अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी आपण गावच्या सर्वांगीण प्रगतीत सिहाचा वाटा देखील उचलत आहात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रिंट मीडिया अडचणीत आला आहे.यात काम करणाऱ्या पत्रकार आणि इतरांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.पण तरीही लोकांची बातम्या जाणून घेण्याची आणि वाचनाची भूक अजिबात कमी झालेली नाही.त्यामुळे येणारा काळ पत्रकारितेसाठी कितीही बिकट असला तरी सरकार तुम्ही तुमचा मार्ग 2 वर्षे आधीच पक्का करून ठेवलाय…!तोच मार्ग पाचगणी न्यूज आणि तुम्हाला यशोशिखरावर घेऊन जाईल.

खरतर,आपण एखाद्यावर  खूप प्रेम करतो.त्यांच्याविषयी आपल्या मनात कमालीचा आदर असतो.पण तो व्यक्त करण्याची संधी आपल्याला सहसा मिळत नाही.बेलोशे सरकार, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही संधी आम्हाला मिळाली हे आमचं भाग्यच!!

आपल्या सर्वच क्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीला आमचा सलाम…!यापुढेही आपण लेखणीच्या माध्यमातून आपला गाव ,परिसर,आपली पाचगणी,परिसर, मश्वर तालुका,जावली तालुका आदींच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहाल हीच अपेक्षा…!आपणास उत्तमोत्तम आरोग्य तृप्त भविष्यकाळ लाभो या सदिच्छेसह वाढदिवस अभिष्टचिंतन…!

सचिन ननावरे, बावधन


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!