राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला यश; फलटण-आदमापूर बससेवा सुरू


स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील बाळूमामा भक्तांसाठी फलटण ते आदमापूर थेट बससेवा सुरू करावी, या राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराने गुरुवार, दि. १४ ऑगस्टपासून फलटण-आदमापूर ही नवीन बससेवा नियमितपणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.

फलटण तालुक्यातून श्री क्षेत्र आदमापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. खाजगी वाहनाने प्रवास करणे गैरसोयीचे आणि खर्चिक ठरत असल्याने, एसटी बस सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली होती.

या मागणीची दखल घेत आगाराने ही नवीन बससेवा सुरू केली आहे. ही बस दररोज दुपारी १२:३० वाजता फलटणहून निघून सायंकाळी ६:३० वाजता आदमापूरला पोहोचेल. परतीचा प्रवास आदमापूरहून दुसऱ्या दिवशी सकाळी ७:०० वाजता सुरू होऊन दुपारी १:०० वाजता फलटणला आगमन होईल. सदर बस पुसेगाव, पुसेसावळी, औंध, कराड आणि कोल्हापूरमार्गे धावणार आहे.

या नवीन बससेवेचा तालुक्यातील सर्व प्रवासी आणि भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण आगार आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!