
दैनिक स्थैर्य । 31 मार्च 2025। सातारा । येथील राष्ट्र सेविका समितीतर्फे श्रीरामनवमी उत्सव बुधवार दि. 2 एप्रिल ते शुक्रवार दि. 4 एप्रिल या दरम्यान होणार आहे. या उत्सवात सौ. अचला वाघ (नाशिक) यांची बुधवार दि. 2 एप्रिल ते 4 एप्रिल अखेर सलग 3 दिवस प्रवचने होणार आहेत.
ही प्रवचने नगर वाचनालय (पाठक हॉल) येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळेत होणार आहेत. या प्रवचनात ‘रामायणातील बंधू’ हा विषय मांडून समाजजागृती करणार आहे.
गेली 15 वर्ष राष्ट्र सेविका समिती हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करीत आहे. राम कृष्ण आपले राष्ट्र पुरुष आहेत. रामसीतेचे जीवन प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. भारतीय संस्कृती घडवण्यात रामसीता यांच्या जीवनाचा खूप मोलाचा वाटा आहे.
ही समर्पक आदर्श जीवन पद्धती आपल्या रोजच्या जगण्यात अंगी कारायची असेल तर रामायण अभ्यासले पाहीजे. समर्थानी सुद्धा सांगितले असे रामकथा त्रिभुवन भेदुंन पैलाड न्यावी. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्र सेविका समितीतर्फे केले आहे.