
बाजरीच्या कणसावर बसलेला पिचू पोपट
स्थैर्य, सातारा, दि. 8 ऑक्टोबर : निसर्गसंपदेने नटलेल्या फलटण तालुक्याच्या जैवविविधतेत भर टाकणार्या ’पिचू पोपट’ या दुर्मीळ पक्ष्याची नोंद झाली आहे. नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष आणि वन्यजीव छायाचित्रकार गणेश धुमाळ यांनी सहकार्यांसह या सुंदर पक्ष्याला कॅमेर्यात कैद केले आहे. गेले काही दिवस सोशल मीडियावर विद्धू पोपट’ या पक्ष्याची छायाचित्र पाहून आपल्या परिसरात त्याचा शोध घेण्याचे गणेश धुमाळ, सुभाष जाधव आणि अनिकेत सोनवलकर यांनी ठरवले.
पक्ष्याच्या अधिवासाचा अभ्यास करून, डोंगरमाथ्याच्या उंच झाडीच्या परिसरात त्यांनी पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. एका ठिकाणी लैंडस्केप फोटोसाठी थांबले असता, त्यांना बाजरीच्या शेतात मुनिया पक्ष्यांचा थवा दिसला.
त्याच थव्यात एक वेगळाच हिख्या रंगाचा पक्षी बाजरीच्या कणसावर ताव मारताना आढळला. जवळ जाऊन पाहिले असता, तोच पिचू पोपट असल्याचे स्पष्ट झाले. ज्या पक्ष्याला शोधण्यासाठी ते मुद्दाम बाहेर पडले होते, तो अनपेक्षितपणे आढळला. यामुळे त्यांना ’काखेत’ कळसा आणि गावाला वळसा’ याची प्रचिती आली.
या पक्षाचे दर्शन घडताच पक्षीमित्रांनी तातडीने त्याला आपल्या कॅमेर्यात बंधिस्त कैले, त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.पानगळीच्या जंगलात उंच झाडांवर आढळतो.
पिचू पोपट शास्त्रीय भाषेत ’लॉरिक्युलस व्हरनालिस’ नावाने ओळखला जाणारा हा पक्षी साधारण 14 सेंटीमीटर लांबीचा असती. त्याचा मुख्य रंग हिस्वा असून, चोच आणि शेपटीजवळील पिसे लाल रंगाची असतात. हा पक्षी सहसा पूर्व हिमालय ते कन्याकुमारीपर्यंतच्या आई पानगळीच्या जंगलात उंच झाडांवर आढळतो. फलटणसारख्या तुलनेने कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात त्याचे दर्शन होणी है वेशील समृद्ध जैवविविधतेचे द्योतक मानले जात आहे.

