रॅपिडोची १८० दशलक्ष डॉलर्सची उभारणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । मुंबई ।  रॅपिडो या भारताच्या सर्वांत मोठ्या बाइक टॅक्सी प्लॅटफॉर्मने आज आपल्या नवीन सीरीज डी फेरीत १८० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या उभारणीची घोषणा केली. नवीन गुंतवणूकदार स्विगीच्या नेतृत्वाखाली या फेरीत टीव्हीएस मोटर कंपनी तसेच विद्यमान गुंतवणूकदार, वेस्टब्रिज, शेल व्हेंचर्स आणि नेक्सस व्हेंचर्स या निधी उभारण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत.

या फंड्सचा वापर रॅपिडोचे तंत्रज्ञान विकसित करणे, विविध क्षमतांमध्ये त्यांच्या टीममध्ये वाढ करून मजबूतीकरण करणे, महानगरे, टायर १, २ आणि ३ शहरांमध्ये मोठ्या ग्राहक पायासाठी एक सुधारित ग्राहक अनुभव देण्याच्या दृष्टीने एकूणच पुरवठा वाढवणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत कनेक्टिव्हिटी देणे यासाठी केला जाईल. यामुळे एक सुलभ, सुरक्षित, सहजसाध्य आणि परवडणाऱ्या दरातील रोजच्या प्रवासाची पर्यायी पद्धत देण्यासाठी रॅपिडोचे अस्तित्त्व सुधारित केले जाईल. रॅपिडो या निधीची गुंतवणूक आपल्या तिन्ही वर्गवारींमध्ये करणार आहे- जसे बाइक टॅक्सी, ऑटो आणि डिलिव्हरी आणि त्यातून आपल्या कॅप्टनचे उत्पन्न वाढवून ही कंपनी सेवा देत असलेल्या १०० पेक्षा अधिक शहरांमध्ये ग्राहकांचा अनुभव सुधारित केला जाईल.

या फेरीतील स्विगीच्या सहभागामुळे या दोन कंपन्यांमधील सहयोग वाढीस लागेल. जास्त फ्लीट उपलब्धतेद्वारे अधिक चांगला ग्राहक अनुभव देण्याच्या सामायिक मोहिमेद्वारे स्विगीचे डिलिव्हरी कर्मचारी आणि रॅपिडोचे कॅप्टन या दोघांनाही जास्त उत्पन्न मिळणे शक्य होईल.

रॅपिडोचे सहसंस्थापक अरविंद संका म्हणाले की, “रॅपिडोमध्ये आम्ही आमच्या स्वप्नाला चालना देण्यासाठी आमच्या विद्यमान आणि नवीन गुंतवणूकदारांचे आभारी आहोत. आम्ही संपूर्ण देशभरात व्याप्ती वाढवण्यासाठी आमच्या व्यवसायाच्या पाठीचा कणा असलेल्या आमच्या ग्राहक आणि कॅप्टन्सचा अनुभव सुधारित करण्यासाठी स्विगीच्या अनुभवातून शिकण्यासाठी उत्सुक आहोत. त्याचबरोबर ईव्हीबाबत खूप उत्साही असलेले आणि मोबिलिटीचे भविष्य असलेले टीव्हीएस मोटर आम्हाला पुढील विस्तारासाठी मदत करतील. आम्हाला आशा आहे की, आम्ही आमच्या भौगोलिक सीमा आणि सेवांचा विस्तार करत असताना घराघरात पोहोचलेले नाव बनवण्याचा आमचा वेग आमच्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाढेल.”

“भारतात मोबिलिटी आणि लॉजिस्टिकच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात रॅपिडोने दाखवलेल्या मेहनतीबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे,” असे मत स्विगीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी यांनी व्यक्त केले.“स्विगी आणि रॅपिडो एक लॉजिस्टिक प्लॅटफॉर्मच्या उभारणीचे स्वप्न बाळगतात, जेणेकरून अधिक संधी आणि जास्त उत्पन्नाद्वारे रायडर्सचे सक्षमीकरण होऊ शकेल. आम्ही आधीपासूनच एकत्र काम करत आहोत. परंतु या गुंतवणुकीतून या दोन्ही प्लॅटफॉर्ममधील समन्वय वाढीस लागेल आणि आम्ही देशभरातील ग्राहक आणि डिलिव्हरी कर्मचारी तसेच कॅप्टन्सना देत असलेले मूल्यही वाढेल,” ते म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!