नोकरीचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । सातारा । विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवून व कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सासपडे (ता. सातारा) येथील युवकावर बलात्काराचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पंकज मोहन यादव (रा. सासपडे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यादव याने त्याच्या नात्यातील एका विवाहितेला प्रथम ‘बैंकेत नोकरी लावतो. त्यासाठी तुला कंप्यूटर क्लास लावावा लागेल. मी तुला क्लास लावतो’ असे आमिष दाखवून घरात कोणी नसताना तिच्याशी बळजबरी करत बलात्कार केला. यावेळी तिचे अश्लील फोटो काढून ‘ ही घटना कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करेन आणि तुझा नवरा व मुलाला ठार मारेन’अशी धमकी दिली.

त्यानंतर वेळोवेळी सातारा येथे लॉजवर व घरी पंकज यादव याने धमकी देत बलात्कार केला.पीडित विवाहितेने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने नवरा व भावाला ठार मारण्याची पुन्हा धमकी दिली. या घटनेची माहिती अखेर विवाहितेने घरच्यांना दिल्यावर त्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात धाव घेत यावही फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पंकज यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि डॉ सागर वाघ करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!