सटालेवाडीतील सावकारावर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाने दिली दोन दिवस पोलिस कोठडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२१ । वाई । महिलेचा पती बाहेरगावी नोकरीला असल्याचा गैरफायदा घेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सटालेवाडी, ता. वाई येथील सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रेय गेणू शिंदे वय 48 असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, महिलेचा पती बाहेरगावी नोकरीला असल्याचा गैरफायदा घेऊन संशयिताने दि. 2 जून रोजी तिच्यावर घरात घुसून बलात्कार केला. बदनामीच्या भीतीने पिडीतेने कुठेही वाच्यता केली नव्हती. यानंतर सावकार दत्तात्रेय शिंदे याने पुन्हा दि.7 जुलै रोजी महिलेच्या घरात भर दुपारी घुसून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी मात्र पिडीतेने पतीला मोबाईलवर फोन लावला. मात्र, सावकाराने तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन भिंतीवर आपटून फोडून टाकला.

पिडीतेचा पती सायंकाळी घरी आल्यावर महिलेने घडल्या प्रकाराची माहिती सांगितली. तथापि, प्रकारामुळे व्यथित झालेल्या पीडितेने घरातील किटक नाशक औषध पिले. पतीने तातडीने तिला उपचारासाठी वाईच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. याची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी पिडीत महिलेचा जबाब घेऊन दत्तात्रेय गेणू शिंदे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच सावकार दत्तात्रेय गेणू शिंदे अटक टाळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसत होता. मात्र, वाई पोलिसांनी सापळा रचून शिंदे यास अटक केली होती. यानंतर गुन्ह्याचा तपास सपोनि रविंद्र तेलतुमडे यांच्याकडे देण्यात आला. सपोनि तेलतुमडे यांनी महिलेस विश्‍वासात घेवून माहिती विचारली असता तिने दि.2 जुन रोजी आरोपी दत्तात्रेय गेणू शिंदे याने बलात्कार केल्याची माहिती दिली. यानंतर पुन्हा महिलेचा पुरवणी जबाब घेऊन बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला वाईच्या न्यायालयात उभे केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!