
स्थैर्य, औंध, दि. १७ : औंध परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सोअंतर्गत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगेश धनाजी पवार रा.अंबवडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की,संबंधित पीडित मुलीचे घरी चिकनचे दुकान असल्याने आरोपी चिकन खरेदी करण्यासाठी येत होता,दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता आपली मैत्री आहे आपण फिरून येऊ असे म्हणत म्हैशाळच्या पुढे कर्नाटक राज्यातील नरबाड येथे मुक्काम केला,त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंबवडे ता.खटाव मंगेशच्या मित्राच्या घरचे बांधकाम असलेल्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला असल्याची माहिती पीडित मुलीने वडिलांना सांगितल्यानंतर औंध पोलीस स्टेशनमध्ये मंगेश धनाजी पवार याचेविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .