दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२२ । सातारा । साताऱ्यातील एका शाळेच्या शिक्षकाने त्याच शाळेत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीला दुसरीच्या वर्गात बोलवून तिचा विनयभंग केल्याची घटना 22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे. पोक्सो अंतर्गत त्या शिक्षकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून शिक्षकास अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी पाटण येथे अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटनेने तीव्र पडसाद उमटत आहेत. अशातच सातारा शहरात एका शाळेतील शिक्षक गंभीरे याने 11 वर्षाच्या विध्यार्थ्यांनीला दुसरीच्या वर्गात बोलवून घेतले. दरवाजा बंद करून त्या शिक्षकाने त्या विधार्थीनीशी गैरवर्तन केले. संबंधित विधार्थीनी या प्रकाराने चांगलीच घाबरून वर्गातून रडत रडत बाहेर आली. तिने घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला. तिच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे हे करत आहेत.