
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे येथे मतदान केले. लोकशाही बळकट करण्याचे आवाहन. वाचा सविस्तर…
स्थैर्य, फलटण, दि. ०७ फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Satara ZP Election 2026) माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) आणि त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर (Jijamala Naik Nimbalkar) यांनी आज निंभोरे (Nimbhore) येथे मतदानाचा पवित्र हक्क बजावला.
सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचून त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. निंभोरे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे होमग्राऊंड असल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि ग्रामस्थांचा मोठा उत्साह दिसून येत होता.
मतदानानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे,” असे आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
