
‘महाराजस्व व शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचा ९ ते १२ जानेवारी दरम्यान फलटण तालुक्यात संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला आहे. सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी सोबत असल्याने जनसमस्यांचा ‘फैसला’ जागेवरच होणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 09 जानेवारी : ‘महाराजस्व व शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडवण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि. ०९ जानेवारी ते सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ या कालावधीत फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये संयुक्त दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यात सर्व शासकीय विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक तत्काळ होण्यास मदत होणार आहे.
दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे:
शुक्रवार, दि. ०९ जानेवारी २०२६:
-
सकाळी ९:०० ते ११:००: जिंती (समाविष्ट गावे: जिंती, फडतरवाडी, खुंटे, शिंदेवाडी)
-
सकाळी ११:०० ते दु. १:००: साखरवाडी (समाविष्ट गावे: साखरवाडी, पिंपळवाडी, होळ)
-
दुपारी १:०० ते ३:००: खामगाव (समाविष्ट गावे: रावडी खु., रावडी बु., खामगाव, मुरुम)
-
दुपारी ४:०० ते सायं. ६:००: पाडेगाव (समाविष्ट गावे: पाडेगाव, परहर खु., कुरुर, मिरेवाडी, शिंदेमाळ, माळवाडी)
-
सायं. ६:०० ते रा. ८:००: तांबवे (समाविष्ट गावे: तांबवे, सालपे, चांभारवाडी).
शनिवार, दि. १० जानेवारी २०२६:
-
सकाळी ९:०० ते १०:००: घाडगेवाडी (समाविष्ट गावे: घाडगेवाडी, मुळीकवाडी)
-
सकाळी १०:०० ते दु. १२:००: बीबी (समाविष्ट गावे: बीबी, वाघोशी, को-हाळे, वडगाव, मलवडी, पिराचीवाडी)
-
दुपारी १२:०० ते १:३०: आदर्की बु. (समाविष्ट गावे: आदर्की बु., आदर्की खु., आळजापूर, कापशी)
-
दुपारी १:३० ते ३:००: हिंगणगाव (समाविष्ट गावे: हिंगणगाव, शेरचीवाडी (हि.), टाकूबाईचीवाडी)
-
दुपारी ४:०० ते ५:३०: ढवळ (समाविष्ट गावे: ढवळ, जोरगाव (वा), वाखरी, शेरचीवाडी (ढ))
-
सायं. ५:३० ते ७:००: तरडफ (समाविष्ट गावे: तरडफ, झडकबाईचीवाडी, मानेवाडी)
-
सायं. ७:०० ते रा. ८:३०: उपळवे (समाविष्ट गावे: ताथवडा, उपळवे, वेळोशी, दयाचीवाडी, सावंतवाडी, जायनगर).
रविवार, दि. ११ जानेवारी २०२६:
-
सकाळी ९:०० ते १०:३०: सस्तेवाडी (समाविष्ट गावे: सस्तेवाडी, कांबळेश्वर, अलगुडेवाडी)
-
सकाळी १०:३० ते दु. १२:००: सोमंथळी (समाविष्ट गावे: सोमंथळी, सांगवी)
-
दुपारी १२:०० ते १:३०: राजाळे (समाविष्ट गावे: राजाळे, सरडे, सोनागाव)
-
दुपारी १:३० ते ३:००: गोखळी (समाविष्ट गावे: टाकळवाडे, गोखळी, खटकेवस्ती, साठे, साठेफाटा, मठाचीवाडी)
-
दुपारी ४:०० ते ५:३०: पवारवाडी (समाविष्ट गावे: पवारवाडी, हनुमंतवाडी, शिवनगर, तामखडा)
-
सायं. ५:३० ते ७:००: आसू (समाविष्ट गावे: आसू, ढवळेवाडी (आ)).
सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६:
-
सकाळी ९:०० ते १०:३०: जावली (समाविष्ट गावे: जावली, मिरढे)
-
सकाळी १०:३० ते ११:३०: आंदरूड
-
सकाळी ११:३० ते दु. १२:००: दुधेबावी
-
दुपारी १२:०० ते २:००: गिरवी (समाविष्ट गावे: गिरवी, धुमाळवाडी, बोडकेवाडी)
-
दुपारी ३:०० ते ६:००: निगुर्डी (समाविष्ट गावे: निगुर्डी, सासकल, मांडवखडक, दालवडी).
तरी या दौऱ्यात महायुतीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी नियोजित वेळेनुसार उपस्थित राहावे आणि आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

