
दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी आज दि. १६ मे रोजी सकाळी ९ वाजता महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद बोलावली असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नक्की कोणत्या विषयवावर पत्रकार परिषद बोलावली आहे; हे जरी स्पष्ट नसले तरी शिंदे यांनी स्पष्ट केले आहे कि, महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.