
दैनिक स्थैर्य | दि. 24 फेब्रुवारी 2025 | फलटण | फलटण शहरातील भारतीय जनता पार्टी व माऊली फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका धार्मिक यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेमध्ये अष्टविनायक पैकी पाच गणपती मंदिरांसह भीमाशंकर मंदिराचे दर्शन घेण्यात आले. यात्रेमध्ये फलटण शहराच्या प्रभाग क्र. १० व ११ मधील २०० महिलांनी सहभाग घेतला होता.
या यात्रेची सुरुवात सकाळी ५ वाजता मोरगाव येथील मोरेश्वर गणपतीच्या दर्शनाने झाली. त्यानंतर रांजणगाव येथे आरती करून नाश्ता करण्यात आला व सर्व यात्रेकरू भीमाशंकरला मार्गस्थ झाले. भीमाशंकर येथे दर्शन घेतल्यानंतर भोजन करून सर्वांनी लेण्याद्री येथे दर्शन घेऊन शेवटची आरती करून ओझर येथे विघ्नहर्ताचे दर्शन घेतले. यावेळी लाडक्या नेत्याला म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दीर्घायुष्य व राजकीय भरभराटीची प्रार्थना विघ्नहर्ताला केली व यात्रेची समाप्ती झाली.
भारतीय जनता पार्टी फलटण शहराध्यक्ष तथा माऊली फौंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी या यात्रेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही यात्रा आयोजित केली होती. या यात्रेमुळे फलटण शहरातील नागरिकांना धार्मिक भावनांची जाणीव करून देण्यात आली आणि समाजातील एकतेची भावना वाढीस लागणार आहे.