
स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ६ मधील भाजप उमेदवार मंगलादेवी नाईक निंबाळकर आणि किरण राऊत यांनी मतदारांना फलटण शहराच्या भविष्यातील विकासाचे आश्वासन दिले आहे. ते मतदारांना सांगत आहेत की, शहरातील प्रत्येक प्रभागात येत्या काळात चांगले रस्ते, स्वच्छ पाणी आणि कचरा व्यवस्थापन एकदम सुयोग्य पद्धतीने होणार आहे.
या दोन्ही उमेदवारांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, रणजितदादांमध्ये हा विकास करण्याची धमक निश्चितपणे आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सर्व विकास योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी फलटण पालिकेमध्ये भाजपाची सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मतदारांनी विकासासाठी भाजपला पाठिंबा द्यावा. त्यांनी मतदारांना भरघोस मतांनी आम्हाला विजयी करा, असे आवाहन केले.
या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात चांगलाच वेग घेतला असून, रोजचा जनसंपर्क त्यांनी सुरू ठेवला आहे. मूलभूत सुविधांची गुणवत्ता सुधारणे आणि रणजितदादांच्या व्हिजनला साथ देणे, या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे.

