दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आगामी काळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात, समाजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे; असे म्हणत रणजितदादा यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांना निवडून आणण्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पराभव होऊन सुद्धा रणजितसिंह यांनी जी भूमिका बजावलेली आहे; त्याबद्दल भारतीय जनता पार्टीकडून लवकरच राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय राहण्यासाठी तुम्हाला कामकाज करावे लागेल; असे मत सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले.
आगामी कामकाजासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांना शुभेच्छा दिल्या.