दैनिक स्थैर्य | दि. 20 डिसेंबर 2024 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे फलटण शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नागपरिषद प्रभाग निहाय पायी दौरा करीत आहेत. त्यामध्ये उद्या दि. २१ रोजी दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग क्र. १ ते ६ मध्ये नगरपरिषद अधिकाऱ्यांच्यासमवेत पायी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी आपल्या समस्या थेट माजी खासदार रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांच्यासमोर मांडाव्यात असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.