खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणी व पाठपुराव्यामुळे सातारा जिल्ह्यासाठी डिजीटल बँक शाखा मंजूर


दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । फलटण । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये डिजीटल बँक शाखा सुरु करण्यात येणार असून त्यापैकी एक बँक शाखा सातारा येथे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याने खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या माढा लोकसभा मतदार संघातील सातारा व सोलापूर जिल्ह्यात या बँक शाखा सुरु करण्याची मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड याचेकडे केली होती. त्यानुसार डॉ. कराड यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पत्राद्वारे मंजुरीचे पत्र दिले आहे.

सातारा येथे डिजीटल बँक शाखा सुरु होत असल्याने जिल्ह्यातील आर्थिक बळकटीला खूप चालना मिळणार आहे, लोकांना घर बसल्या ठेवी, कर्जाचे व्यवहार करता येणार आहेत, कसल्याही पद्धतीचे कागदपत्रे हाताळावी लागत नसून ही बँक चोवीस तास सुरु राहणार असून कधीही पैसे काढणे, भरणे सोपे होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने बँक व्यवहार करता येणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.

देशांमध्ये अशा ७५ बँक शाखा मंजूर झाल्या असून त्यापैकी एक सातारा जिल्ह्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाली असून ही बँक नवीन रोबोटिक व आधुनिक तंत्रज्ञानाने चालणार असल्याने औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील ग्राहकांचे दृष्टीने सोयीस्कर असलेल्या या बँकेतून खुप मोठी उलाढाल अपेक्षित आहे. साहजिकच उद्योग व व्यापार क्षेत्रातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!