रणजित निंबाळकर यांची फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । फलटण । सुमारे 125 वर्षांचा इतिहास असणशर्‍या, शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर अशा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी रणजित निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीबद्दल त्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पुष्पगुुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य विश्‍वासराव देशमुख आदींसह मान्यवर उपस्थित होते.

सन 2015 ते 2020 या कालावधीत रणजित निंबाळकर यांनी विंचुर्णी गावचे सरपंचपद भूषविले आहे. त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या मुलभूत गरजा, रस्ते, पाणी, वीज आदींचे गावातील कायमस्वरुपी प्रश्‍न सोडवण्यात त्यांना यश आले होते. ना.श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या माध्यमातून फलटण – विंचूर्णी रस्त्यांचा प्रलंबित प्रश्‍न, तसेच धोम – बलकवडी कॅनॉलचे पाणी विंचूर्णीच्या तलावात सोडून पाण्याचा प्रश्‍नही त्यांनी सोडवला.

आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेत रणजित निंबाळकर कार्यरत असून त्यांनी सन 2006-07 मध्ये लायन्स क्लब फलटणचे अध्यक्षपद, 2013-14 मध्ये रिजन – 2 चे रिजन चेअरमनपद भूषवले आहे. फलटण तालुका कृषी सेवा केंद्र संघटनेचे ते अध्यक्ष असून जिल्हा डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही ते काम करीत आहेत.

दरम्यान, सदर निवडीबद्दल रणजित निंबाळकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!