दैनिक स्थैर्य | दि. 15 जानेवारी 2025 | फलटण | फलटण शहरातील विद्यानगर येथील युवा नेते रणजित संभाजीराव भोईटे यांनी भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश समारंभ फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रणजित भोईटे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. या प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, गुड्डू पवार, रणजित भोईटे यांचा मित्र परिवार उपस्थित होता. रणजीत भोईटे हे सामाजिक कामात अग्रेसर असणारे युवा नेते आहेत.