
स्थैर्य, सातारा, दि. 1 डिसेंबर : श्री क्षेत्र निगडी (ता. कोरेगाव) येथे गुरुवारपासून (दि. 11) श्री निजानंद रंगनाथ स्वामींचा 341 पुण्यतिथी उत्सव सुरू होणार आहे. यानिमित्ताने 17 डिसेंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवात गुरुवारपासून (दि. 11) शनिवारअखेर (दि. 13) दररोज महारुद्र अभिषेक, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळची आरती व गुरुगीता पठण आदी कार्यक्रम होणार आहेत. उत्सवाच्या मुख्य दिवशी रविवारी (दि. 14) सकाळी सहा ते दुपारी 12 या वेळेत महारुद्र, अभिषेक, पूजा पुष्पवृष्टी व महाआरती होईल. दुपारी साडेबारा ते सायंकाळी सात या वेळेमध्ये ’श्रीं’ची पालखीतून मिरवणूक व त्यासमोर भारूड होईल. रात्री नऊ वाजता हभप विलासबुवा गरवारे महाराज यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी (दि. 15) सकाळी साडेसात ते दुपारी दोन यावेळेत महारुद्र, महाआरती, फराळ होईल. दुपारी दोन वाजता विठाई महिला भजनी मंडळाचे (कोरेगाव) भजन होईल. दुपारी प्राजक्ता प्रसाद गोसावी यांचे मणाचे श्लोक निरूपण होईल. दुपारी चार ते पाच या वेळेत स्वप्ना खळदकर यांचा भूपाळी ते भैरवी असा गायनाचा कार्यक्रम होईल. रात्री आठ वाजता हभप विलासबुवा गरवारे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.
मंगळवारी (दि. 16) सकाळी साडेसात ते साडेअकरा यावेळेत महारुद्र, महाआरती, दुपारी 12 ते दोन महाप्रसाद वाटप होईल. दुपारी दोन ते तीन यावेळेत शरद ईश्वरा गुरव यांचे गायन, सायंकाळी पाच ते सात यावेळेत वंदना मिलिंद कापरे यांचे कीर्तन होईल. रात्री आठ ते दहा या वेळेत सुनेत्रा अनिरुद्ध भंडारे यांचे कीर्तन होईल. बुधवारी (दि. 14) सकाळी नऊ ते 11 यावेळी हभप विलासबुवा गरवारे महाराज यांचे लळिताचे प्रसादाचे कीर्तन होणार आहे. सकाळी 11 ते 11.15 या वेळेत महाराजांच्या तलवारीवरील लिंबाचा लिलाव होईल. दुपारी 12 ते दोन यावेळेत महाप्रसाद वाटप होईल. दुपारी दोन ते चार यावेळेत प्राक्षाळ पूजा व उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सवात भाविक व भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सच्चिदानंद गोसावी, प्रसन्न शशिकांत गोसावी, अमरनाथ अच्युत गोसावी, मोहन भगवंत गोसावी व ग्रामस्थांनी केले आहे.

