दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटणकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा रथ मिरवणूक सोहळा गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी साजरा होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता श्रीराम मंदिरापासून निघून नेहमीच्या मार्गाने रथ सोहळा मार्गस्थ होऊन सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिराजवळ येऊन संपन्न होणार आहे. अशी माहिती श्री नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चारिटी ट्रस्ट फलटण यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेली आहे.
यासोबतच दि. 20 नोव्हेंबर 2022 पासून 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
रविवार, दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर रात्री ९ ते ११ या वेळेमध्ये प्रभावळीचे वहन असणार आहे.
सोमवार, दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये कीर्तन सेवा असणार आहे तर रात्री ९ ते ११ या वेळेमध्ये शेषाचे वहन असणार आहे.
मंगळवार, दि. 22 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेमध्ये कीर्तन सेवा असणार आहे. तर रात्री ९ ते ११ यावेळेमध्ये गरुडाचे वहन असणार आहे.
बुधवार, दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये प्रभू श्रीरामांच्या रथास लघुरुद्राभिषेक होऊन दुपारी २ नंतर रथास पोशाख करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेमध्ये कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. तर रात्री ९ ते ११:या वेळेमध्ये मारुतीचे वहन असणार आहे.
गुरुवार, दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेमध्ये प्रभू श्रीराम मंदिरामध्ये कीर्तन सेवा होऊन श्रींची मूर्ती सकाळी ८ वाजता प्रभू श्रीरामांच्या रथामध्ये बसून रथाची नगर प्रदक्षिणा संपन्न होणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रभू श्रीरामचंद्रांचा रथ सोहळा मंदिरामध्ये पुन्हा येणार आहे.
त्यानंतर सोमवार, दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्रींची पाकळणी सकाळी काकडा आरती व कीर्तन होऊन नंतर प्रभू श्रीरामचंद्रास लघुरुद्राभिषेक व महापूजा संपन्न होणार आहे.