
दैनिक स्थैर्य | दि. ०६ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
नाभिक समाजाबद्दल आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले वक्तव्य हा वीर जीवा महालांचा व संत सेना महाराजांचा अपमान आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो, असे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.
फलटण येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी हातवारे करत नाभिक समाजाबद्दल वक्तव्य करून वीर जीवा महाला यांचे वंशज वसंत सेना महाराज यांचे अनुयायी असलेल्या नाभिक समाजाबद्दल वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. आ. रामराजेंचा मी जाहीर निषेध करतो.
वास्तविक पाहता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तालुक्यामध्ये करत असलेले काम बघून राजे गटाच्या पायाखालची वाळू सरकली असून येणार्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पराभव समोर दिसत असल्याने रामराजे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यामुळेच ते जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत, असे अनुप शहा यांनी म्हटले आहे.