४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
दैनिक स्थैर्य | दि. 04 ऑगस्ट 2024 | फलटण | प्रसन्न रूद्रभटे | लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सर्वच नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणचा राजे गट हा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सध्या फलटण तालुक्यात सुरू आहेत. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे; राजे गटाच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्ट वरून पक्ष चिन्ह व नेतेमंडळीचे फोटो गायब झाले आहेत. त्यामुळे नक्की राजे गट येणाऱ्या विधानसभेत कोणती भूमिका घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सन 1991 साली फलटण तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला. 1995 साली झालेल्या निवडणुकीत श्रीमंत रामराजे हे विधानसभेवर अपक्ष बनून निवडून गेले होते. त्यानंतर 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून ते शरद पवार यांच्यासोबत होते. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या सत्ताबदला मध्ये श्रीमंत रामराजे यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीमंत रामराजे यांनी ठरवून माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर त्यांच्या गटाच्या सोशल मीडिया पोस्ट वरून पक्ष चिन्ह व नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत.