दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । फलटण । सातारा जिल्ह्याचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची विधानपरिषदेच्या सदस्य पदी तिसऱ्यांदा निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच फलटण येथे येत आहेत. त्या प्राश्वभूमीवर फलटणमध्ये येत असल्याने “मी आज फलटणला येत आहे. कृपया हार आणू नका. रोप आवश्यक वाटल्यास आणावीत. आभार” असे स्टेटस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp द्वारे पोस्ट केले आहे.
विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणूकीत ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी २८ मते मिळवुन विजयाची मोहर उमटवली आहे. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राज्यात असणारा दबदबा पुन्हा एकदा दिसुन आला आहे. निवडणुकीत झालेल्या मतदानात व त्यांनतर करण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ मते मिळाली आहेत व ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग तिसर्यांदा विजयी झाले असून या निकालामुळे राज्याच्या राजकारणातील ना.श्रीमंत रामराजे यांचा करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या निकालामुळे ना.श्रीमंत रामराजे यांची सन 1991 पासूनची सलग 31 वर्षांची यशस्वी राजकीय घोडदौड सुरु आहे.