फलटण नगरपालिका निवडणुकीत श्रीमंत रामराजे देणार धक्कातंत्र ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2025 | फलटण | नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजे गटाचे उमेदवार दीपक चव्हाण यांचा पराभव झाल्याने व राजे गटातील अनेक आजी व माजी नगरसेवक राजे गट सोडून जात असल्याने, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आता फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह मोडवर आले आहेत.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे प्रभागनिहाय जुन्या व जाणत्या प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका घेत आहेत. फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदापासून त्यांच्या राजकारणाची सुरवात झाली असल्याने, आगामी काळामध्ये आमदार जरी निवडून आला नसला तरी सुद्धा, नगरपालिका हातामधून जाऊन न देण्यासाठी त्यांनी विशेष रणनीती आखली आहे.

फलटण नगरपालिकेमध्ये एकूण 25 नगरसेवक आहेत. गत निवडणूक ही जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या प्रमाणे झाली होती, ज्यामध्ये श्रीमंत रामराजे यांच्या गटाकडून लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून सौ. नीता मिलिंद नेवसे निवडून आल्या होत्या. आता होणाऱ्या निवडणुका सुद्धा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदानुसारच होणार असल्याच्या चर्चा आहेत.

आगामी काळामध्ये होणाऱ्या नगरपालीका निवडणुकीत श्रीमंत रामराजे हे धक्कातंत्र देत समाजामध्ये प्रतिष्ठित, शिक्षित असणाऱ्या मान्यवरांना उमेदवारी देतील असा अंदाज बांधला जात आहे. सन 2021 साली सौ. नीता मिलिंद नेवसे यांच्या नगराध्यक्षा यांच्या बॉडीचा कार्यकाळ संपला असून, तेव्हापासून नगरपरिषदेवर प्रशासकराज आहे.

नगरपालिकेवर निवडून जायचे असणाऱ्या सर्व भावी नगरसेवक पायाला बाशिंग बांधून तयार आहेत. सन 2011 च्या जनगणनेनुसार 52 हजार 118 एवढी लोकसंख्या फलटण शहराची आहे. नक्की कोणता पक्ष भावी नगरसेवकांना संधी देणार की दोन्ही नेते सुद्धा धक्कातंत्र वापरणार, याचे उत्तर मात्र काळाच्या पोटामध्येच दडले आहे.

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)


Back to top button
Don`t copy text!