रामोशी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे

रविकाका खोमणे; हरी मकाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 5 एप्रिल 2025। फलटण । आजचा रामोशी समाज हा आजही शिक्षणापासून वंचित राहत आहे. या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देवुन शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कार्यशाळेचे आयोजन करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे मत भाजपचे भटक्या विमुक्त जातीचे पुणे जिल्हाध्यक्ष रविकाका खोमणे यांनी यावेळी व्यक्त केले.

जेजुरी (पुणे) येथे हरी मकाजी नाईक यांच्या 146 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, बाबा चव्हाण, फलटण तालुकाध्यक्ष मनोज आडके, गणेश पाटोळे, शोभाताई चव्हाणस यांच्यासह समाजबांधव उपस्थित उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस हरी मकाजी नाईक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.

रविकाकाखोमणे म्हणाले की, आदय क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्र्याची प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले. त्यापैकी एक हरी मकाजी नाईक. हरी मकाजी नाईक यांनी सातार्‍यातील रामोश्यांना एकत्र केले. त्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात चळवळ सुरू केली.

त्यांनी गोरगरीब जनतेसाठी इंग्रजांविरोधात संघर्ष केला. इंग्रजांनी मकाजी नाईक यांना पकडून देणार्‍याला बक्षिस जाहीर केले होते. इ.स. 1878 च्या सुरवातीला मकाजी नाईक यांनी इंग्रजांच्या अखत्यारीतील पुण्यातील शासकीय कार्यालय, कोषागार व कार्यालयावर हल्ला केला. मकाजीने सलग 15 हल्ले करून इंग्रज सरकारचे कंबरडे मोडले होते.


Back to top button
Don`t copy text!