संबोधी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी रमेश इंजे यांची निवड


स्थैर्य, सातारा, दि. 30 सप्टेंबर : संबोधी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कोल्हापूर विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता रमेश इंजे यांची एकमताने निवड झाली आहे, अशी माहिती माजी अध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी दिली.
संबोधी प्रतिष्ठानची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनकर झिंब्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी प्रा. प्रशांत साळवे, कोषाध्यक्षपदी यशपाल बनसोडे व सहकार्यवाहपदी डॉ. सुवर्णा यादव यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यवाहपदी अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांना कायम करण्यात आले आहे.

संबोधी प्रतिष्ठाच्या संचालक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक पार पडली. सर्व 11 सदस्य बिनविरोध निवडूण आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रमणी बनसोडे यांनी वार्षिक सभेत जाहीर केले. नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच नवीन कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र इतिहास परिषदेचे कार्यवाह डॉ. जयपाल सावंत, अशोक भोसले व अशोक कांबळे यांचा सत्कार दिनकर झिंब्रे यांच्या हस्ते करण्यात आला. सोनल इंजे यांनी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयास सादर केलेल्या डिझाईन पेटंटला मान्यता मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय कांबळे व दिनकर झिंब्रे यांचे हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. या वार्षिक सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!