प्रा.रमेश आढाव यांनी बजावला मतदानाचा हक्क

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संविधान समर्थन समिती पुरस्कृत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी ग्रामस्थांसमवेत गुणवरे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी याकरिता संविधान समर्थन समितीकडून मोठी चळवळ उभारण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रा.रमेश आढाव या निवडणुकीत उतरले आहेत.

“ही निवडणूक सर्वसामान्यांच्या घटनात्मक हक्काची आणि विकासाची आपल्याला करायची होती “, असे सांगून “मतदारांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे”, असे आवाहन प्रा.रमेश आढाव यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!