दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । नामांकित विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या रामदास पोपट गाडे (वय 33, रा. लाखानगर वाई) याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन इयत्ता १० मध्ये शिकणार्या १५ वर्षीय शाळकरी मुलाला महाविद्यालयाचे काम आहे, असे सांगून तू जर आला नाहीस तर तुला नापास करीन, तुझे प्रेमसंबंध आहेत असे सांगून बदनामी करण्याची धमकी देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याने त्याच्यावर पोक्सोअंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामदास गाडे याने दि. 19 ऑगस्ट 2016 ते 4 ऑक्टोबर 2017 या कालावधीत वेळोवेळी बंगल्यातील खोलीत नेऊन मुलाला मोबाईलमधील महिलांचे अश्लिल व्हिडीओ दाखवले व दमदाटी देऊन अत्याचार केले. या अत्याचारविरूद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतो. या गुन्ह्याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. वेताळ यांनी करून आरोपीविरूद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान एकून 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी निर्भीडपणे दिलेली साक्ष, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी धरले आणि गुरूवार दि. 3 रोजी पोक्सो अंतर्गत एकत्रित 10 वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली. यामध्ये वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे-खराडे, पोलीस नाईक बाळासाहेब भरणे, पोलीस कॉ. राम मुकाप्पा कोळी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, सुधीर खुडे, गजानन फरांदे, पोलीस नाईक रिहाना शेख, पोलीस अंमलदार राजेद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी योग्य ती मदत केली.