रामचंद्र नाईक निंबाळकर यांच्यावतीने स्वखर्चातून सस्तेवाडीत १३६ कुटुंबांना अत्यावश्यक किटचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २८ : राज्यासह जिल्ह्यात व फलटण तालुक्यात कोरोना पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणार्‍या गोरगरीब, गरजूंचे हाल होत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी प्रशासनाने लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिली आहे पण कोरोना बाधीत रुग्ण सापडलेल्या ठिकाणी प्रशासनाच्या प्रतिबंधाची काटेकोर अंमलबजावणी सुरु आहे. नुकत्याच बाधीत रुग्ण सापडलेल्या सस्तेवाडीतही जीवनावश्यक मदतीअभावी हातावर पोट असणार्‍या गोरगरीब गरजूंचे हाल होऊ नये म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेवरून आणि आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर यांच्यावतीने स्वखर्चातून सस्तेवाडी येथील १३६ कुटुंबांना अत्यावश्यक किट (साखर, तेल, तांदूळ, तुरडाळ, शेंगदाणे, रवा, पोहे, चहा पावडर, साबण, चटणी, हळद, बिस्किट इत्यादी) संसार उपयोगी अशाप्रकारच्या किटचे गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत सस्तेवाडीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राम (दादा) नाईक निंबाळकर, सुनील वाबळे, प्रकाश वाबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संचालक संजय कदम तसेच सुदाम कदम, तानाजी धुमाळ, पोलीस पाटील अविनाश धुमाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संचालक समर जाधव, व्यापारी चेतन घडिया इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह उपस्थित सर्वांनीच सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करून  नियम पाळुन लाभ घेतला. याप्रसंगी मान्यवरांच्या व प्रशासनाच्या सुचनांचा आदरपूर्वक अंमलबजावणी करुन सहकार्य करावे आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे अवाहन करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!