लेखक सचिन गोसावी यांचे वडील रामचंद्र गोसावी यांचे निधन


प्रसिद्ध लेखक व व्याख्याते सचिन गोसावी यांचे वडील रामचंद्र भिकन गोसावी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. सविस्तर बातमी वाचा.

स्थैर्य, फलटण, दि. १० डिसेंबर : फलटण येथील प्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते सचिन गोसावी यांचे वडील रामचंद्र भिकन गोसावी (वय ६५) यांचे बुधवारी (दि. ३ डिसेंबर) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अत्यंत हुशार आणि समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची फलटण तालुक्यात ओळख होती.

रामचंद्र गोसावी यांना ३ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने गोसावी कुटुंबावर आघात झाला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रामचंद्र गोसावी हे स्वभावाने अत्यंत मितभाषी आणि हुशार व्यक्तिमत्व होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि ४ नातवंडे असा मोठा परिवार आहे. लेखक सचिन गोसावी हे त्यांचे सुपुत्र आहेत.


Back to top button
Don`t copy text!