
दैनिक स्थैर्य । 26 मार्च 2025। फलटण । श्रीराम नवमीचे औचित्य साधून येथील प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात गुढीपाडवा ते श्रीराम नवमी या कालावधीत रामरक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक उपक्रमात श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
यानिमित्ताने रविवार, दि. 30 मार्च (गुढीपाडवा) ते दि. 6 एप्रिल (श्रीराम नवमी) या दरम्यान दररोज सायंकाळी 5.30 वाजता उपळेकर महाराज मंदिरात तेरा वेळा रामरक्षा पठण होणार आहे. उपक्रमात सहभागी होताना भाविकांनी रामरक्षेचे पुस्तक घेऊन यावे, असेही आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहेे.