दैनिक स्थैर्य । दि. ०६ मार्च २०२२ । अमरावती । रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
बडनेरा येथील मैदानावर आयोजित माँ कनकेश्वरी देवी जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित रामचरित मानस कथागंगा संमेलनाला श्री. फडणवीस यांनी भेट देऊन रामायण ग्रंथ व माताजींचे दर्शन घेतले. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी, किरण पातुरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
माँ कनकेश्वरी व रामायणाचे दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काही वेळ कार्यक्रमस्थळी थांबून रामकथेचे श्रवण केले.