संविधान दिन दिनानिमित्त साताऱ्यात रॅली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे. तो कोण्या एका धर्माचा, पंथाचा, जातीचा, वंशाचा नाही तर तो संपूर्ण भारत राष्ट्राचा असून याच संविधानावर गेली ७० -७२ वर्षे राष्ट्र एकसंघपणे टिकून आहे. मानव कल्याणाचे पर्यायाने राष्ट्र उन्नयनाचे हित जपणाऱ्या या संविधानाचा गौरव व्हावा या उद्देशाने दि. २६ नोव्हेंबर अर्थात संविधान दिनी साताऱ्यात संविधान जागर अभियान राबवण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल व तेथून पोलीस मुख्यालयामार्गे छ. शिवाजी महाराज पुतळ्यापर्यत मिरवणूक काढण्यात आली.संविधान जागर अभियानात सकाळी १० वाजता समता सैनिक दलाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बिगूल वाजवून मानवंदना देण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून संविधान मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, साहित्यिक पार्थ पोळके, मिनाज सय्यद, चंद्रकांत खंडाईत, नारायण जावलीकर आदी उपस्थित होते. ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा व तेथून पोलीस मुख्यालयामार्गे छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यत काढण्यात आली.

यावेळी याठिकाणी संविधानाच्या उदेशिकेचे जाहीर वाचन करण्यात आले. संविधान नेमके काय आहे? त्यांचा राष्ट्राच्या आणि राष्ट्रातील माणसाच्या दैनंदिन वर्तनव्यवहाराशी नेमका कसा संबध येतो हे अभ्यासन्यासाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत अनेकांनी घरात तर काहींनी चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचे जाहीरपणे वाचन केले. तर विविध संघटनाच्यावतीने शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!