स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निम्मित टेक्निकल विद्यालयाने सैनिकांसाठी बनवल्या राख्या


दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑगस्ट २०२२ । बारामती । बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निम्मित इ 9 वी व इ 10 वी च्या विद्यार्थीनीनी स्काऊट गाईड या विषयांतर्गत अनेक सुंदर राख्या तयार केल्या आहेत.या सर्व राख्याचे प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयात आज विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,यांच्या हस्ते पार पडले.यावेळी रयत बँकेचे माजी चेअरमन व आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे ,ज्युनिअर विभाग प्रमुख श्री आनंदराव करे, एम.सी.व्ही.सी विभाग प्रमुख श्री सुधीर जाधव,टेक्निकल विभाग प्रमुख श्री शशिकांत फडतरे ,जेष्ठ शिक्षक श्री मोहन ओमासे, सुनील चांदगुडे,जयवंतराव मांडके, महादेव शेलार,सुदाम गायकवाड, अरविंद मोहिते उपस्थित होते.या प्रदर्शना नंतर या सर्व राख्या भारतीय सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे यांनी केले तसेच टाकाऊ वस्तूपासून या सुंदर राख्या तयार करून विद्यार्थांनी आपल्या कलागुणांना असाच वाव द्यावा याबाबतीत सरांनी मार्गदर्शन केले.या सर्व विद्यार्थिनींना राख्या तयार करण्याचे मार्गदर्शन विद्यालयातील उपशिक्षिका सौ.स्मिता काळभोर व उर्मिला भोसले यांनी केले.तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निम्मित विद्यालयात निबंध,वक्तृत्व, चित्रकला, मेहंदी,रांगोळी स्पर्धा ,स्वच्छ वर्ग अश्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!