‘रक्षक रयतेचा न्यूज’च्या गौरी सजावट व सेल्फी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

गौरी सजावटमध्ये सौ. पूनम रणवरे, तर सेल्फी स्पर्धेत सौ. श्रद्धा बाचकर प्रथम; मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव


स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : ‘रक्षक रयतेचा न्यूज’ व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गौरी सजावट आणि सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ येथील नगरपालिकेच्या नवीन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. गौरी सजावट स्पर्धेत सौ. पूनम नितीन रणवरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेत सौ. श्रद्धा बाचकर यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजनकाका देशमुख महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून के. बी. उद्योग समूहाच्या संचालिका सौ. सुजाताताई सचिन यादव, नवनिर्माण सेवा संघाच्या अध्यक्षा सौ. कल्पनाताई गिड्डे, फलटण नगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक मोहनकुमार शिंदे, अभियंता सिमरन पठाण यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. ‘रक्षक रयतेचा न्यूज’ने अल्पावधीतच एक चांगला ब्रँड निर्माण केला असून, त्यांचे महिलांसाठीचे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे सौ. सुजाताताई यादव यांनी सांगितले. सौ. कल्पनाताई गिड्डे यांनी भविष्यात एकत्रितपणे महिलांसाठी कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले, तर परमपूज्य राजनकाका देशमुख यांनी स्पर्धेतील हार-जीत खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याचा सल्ला दिला.

यावेळी नगरपालिकेच्या वतीने मोहनकुमार शिंदे यांनी बचत गटांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली, तर सिमरन पठाण यांनी पंतप्रधान आवास योजनेविषयी मार्गदर्शन केले. ‘रक्षक रयतेचा न्यूज’चे संपादक नसीर शिकलगार यांनी वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:

  • गौरी सजावट स्पर्धा:
    • प्रथम क्रमांक: सौ. पूनम नितीन रणवरे (देखावा – राधाकृष्ण)
    • द्वितीय क्रमांक: सौ. रूपाली धीरज टाळकुटे (देखावा – भिडे वाडा)
    • तृतीय क्रमांक: सौ. रूपाली निलेश पोतेकर (देखावा – नारीशक्ती)
    • चतुर्थ क्रमांक: सौ. रेश्मा धनंजय कदम (देखावा – गुरुचरित्र)
    • पाचवा क्रमांक: सौ. स्नेहल खलाटे (देखावा – इंडियन आर्मी)
  • सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा:
    • प्रथम क्रमांक: सौ. श्रद्धा बाचकर
    • द्वितीय क्रमांक: अर्चना पिसे
    • तृतीय क्रमांक: सोनाली गायकवाड
    • चतुर्थ क्रमांक: अमृता कोंडके
    • पाचवा क्रमांक: धनलक्ष्मी बर्वे

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत धनवडे, कमलेश भट्टड, तात्यासाहेब गायकवाड, इम्तियाज तांबोळी यांच्यासह संयोजन समितीने परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!