बारामती लीनेस क्लबतर्फे अग्निशमन दलाच्या जवानांसोबत रक्षाबंधन साजरे


स्थैर्य, बारामती, दि. 12 ऑगस्ट : संकटकाळी धावून येऊन नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, बारामती येथील लीनेस क्लबच्या वतीने एमआयडीसी अग्निशमन केंद्रामध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

याप्रसंगी लीनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे, खजिनदार मनीषा खेडेकर, कॅबिनेट ऑफिसर सुवर्णा मोरे, विजया कदम आणि सुनिता तावरे यांनी जवानांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या.

या उपक्रमाचे स्वागत करून, बारामती एमआयडीसी अग्निशमन केंद्रप्रमुख सुनील इंगवले यांनी आग लागल्यानंतर किंवा अपघातप्रसंगी अग्निशमन दल कसे कार्य करते, तसेच आग टाळण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

लीनेस क्लबच्या अध्यक्षा उज्वला शिंदे यांनी, अग्निशमन दलाचे जवान संकटकाळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावतात, त्यांच्या या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!