राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 1 : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते.

त्यांना उपचारासाठी सिंगापूर इथल्या दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. उपचादारम्यान त्यांचं निधन झालं आहे. 2013 मध्ये किडनीचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर दुबईत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा राजकीय कामांना सुरुवात केली होती.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. त्यावेळी त्यांनी ट्वीटवर एक व्हीडिओ शेयर करत म्हटलं होतं की, टायगर अभी जिंदा है.

अमरसिंह हे एकेकाळी समाजवादी पक्षातलं मोठं नाव होतं. ते मुलायम सिंह यादव यांच्या अतिशय विश्वासातले समजले जायचे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!