स्थर्य, फलटण, दि. 22 : राजुरी ता.फलटण येथील कु.श्वेता हणमंत सांगळे हीने भारत सरकारच्या नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आणि तिची सी.बी.एस.ई चे जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे ६ वी पासुन पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.
श्वेता सांगळे ही हणमंतवाडी येथील फलटण एज्युकेशन सोसायटीचे सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर विद्यालय व जुनिअर कॉलेज हनुमंतवाडी ता.फलटण येथे इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण राजूरी येथील जिल्हा परिषद शाळा सांगळेवस्ती येथे झाले. ११जानेवारी २०२० रोजी नवोदय परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 19 जून 2020 रोजी जाहीर झाला आहे त्यामध्ये श्वेता हिची निवड झाली आहे. श्वेता राजुरी येथे चौथीपासून तयारी करत होती. ही मुलगी एका शेतकरी कुटुंबातील आहे तिच्या या यशाबद्दल तिचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच ग्रामस्थ यांच्याकडून शुभेच्छांचं वर्षाव होत आहे.
तसेच या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मारुती रामचंद्र सांगळे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद दादा वडूजकर, अरविंद निकम सर, श्रीकांत फडतरे सर, मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी प्राचार्य रुपनवर सर यांनी अभिनंदन केले.
विशेष सहकार्य – हनुमंत वाडी शाळेचे शिक्षक व राजुरीचे रहिवासी दादासाहेब दगडू साळुंखे सर व बुधचे अभय जगदाळे सर यांनी केले. तसेच हनुमंतवाडी शाळेचे मुख्याध्यापक शेडगे सर वर्ग शिक्षक यादव सर नाळे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी व जिल्हा परिषद शाळा सांगळे वस्तीचे शिक्षक काशीद सर तात्यासो आढाव सर सोमनाथ वाठारकर सर यांनी देखील अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्वेता ही सर्वगुणसंपन्न असे नेतृत्व करणारी रणरागिनी आहे, ती कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकते असे प्रतिपादन तिचे मामा राहुरी विद्यापीठ गोल्ड मेडलिस्ट अनिल कांतीलाल माळवे यांनी केले. श्वेताला मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व गुरूंचे श्वेताच्या कुटुंबीयांकडून मनःपूर्वक आभार मानले.