दहिवडीत चेक बाउन्सप्रकरणी राजू शिंदे यास सहा महिन्याचा कारावास; प्रियदर्शनी पतसंस्थेला दोन लाखाची नुकसान भरपाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२२ । दहिवडी । दहिवडी, ता. माण येथिल प्रियदर्शनी पतसंस्थेच्या कर्ज प्रकरणातील परत फेडीसाठी राजू बयाजी शिंदे यांनी दिलेला दोन लाखाचा धनादेश वटला नाही. याप्रकरणी पतसंस्थेने दहिवडी न्यायालयात शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीची केस दाखल केली होती. या केसचा नुकताच निकाल लागला असून दहिवडी न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.थोरात यांनी संस्थेच्या फसवणूक व चेक बाउन्स प्रकरणी संस्थेला दोन लाख नुकसानभरपाई तर आरोपीस सहा महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. मिळालेली माहिती अशी, दहिवडी ता. माण येथील प्रियदर्शनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.दहिवडी या संस्थेचे राजू शिंदे यांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी बँक ऑफ बडोदा शाखा दहिवडी या बँकेचा दोन लाखाचा धनादेश दिला होता.

दोन लाख रुपयांचा हा धनादेश शिंदे यांच्या खात्यावर रक्कम नसल्याने वटला नाही व तो धनादेश (चेक) बाउन्स झाला होता. या प्रकरणात प्रियदर्शनी पतसंस्थेने राजू शिंदे यांना कायदेशीर नोटीस दिली होती. या नोटीसाला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यानंतर याप्रकरणी पतसंस्थेने दहिवडी न्यायालयात शिंदे यांच्या विरोधात चेक बाउन्स व फसवणुकीची एनआय अक्ट १३८ नुसार फौजदारी केस दाखल केली होती. या केसचा निकाल नुकताच दहिवडी न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर.थोरात यांनी दिला आहे. यामध्ये चेक बाउन्स प्रकरणी राजू शिंदे यास सहा महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून पतसंस्थेला दोन लाख रुपये राजू शिंदे यांनी भरणेचे आहेत. प्रियदर्शनी पत संस्थेच्या वतीने अॅड. विजयकुमार काळे यांनी काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!