दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी फलटण येथील राजू मारूडा यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना नियुतीचे पत्र अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीपआण्णा शिवप्रकाश चांगरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या कार्यालयात प्रदान करण्यात आले.
या निवडीबद्दल राजू मारूडा यांचे फलटण येथील संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.