दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । विडणी । आदर्शवत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती काल दि. 12 जानेवारी रोजी विडणी ग्रामपंचायत कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत साजरी करण्यात आली.
यावेळी विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग, सुनील शिंदे, सौरभ जगताप, नचिकेत जगताप, मोनू जगताप, दिनेश अभंग, सुबोध शिर्के, बजरंग भगत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.