दैनिक स्थैर्य | दि. १७ जानेवारी २०२५ | फलटण |
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका अध्यक्षपदी ‘नमस्ते फलटण’ यूट्यूब चॅनलचे उपसंपादक राजकुमार गोफणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
याबरोबरच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका कार्याध्यक्षपदी आनंदा पवार, उपाध्यक्षपदी शकील सय्यद तर संघटकपदी सागर जाधव यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजा माने, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.