राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०२१-२२; विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांच्या ‘उभारी’सह नाशिक विभागाला नऊ पुरस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२२ । नाशिक । प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णय क्षमता आणण्यासाठी तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा राबविण्यात येते. या अभियानांतर्गत सहभाग घेवून सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये, अधिकारी व सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम सूचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात येते. 2021-2022 चे ही विविध पुरस्कार जाहीर झाले असून, त्यात विभागीय आयुक्त राधकृष्ण गमे यांच्या ‘उभारी’उपक्रमासह नाशिक विभागाला 9 पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.

ही स्पर्धा चार गटात घेवून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर हे अभियान व स्पर्धा राबविण्यात आली आहे. स्पर्धेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी  प्रधानमंत्री पारितोषिक योजनेच्या धर्तीवर ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले होते. त्यात प्रशासकीय गतिमानता अंतर्गत मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून येणारे प्रस्ताव, राज्यातील मुख्यालयाच्या ठिकाणाहून थेट येणारे प्रस्ताव, विभाग स्तरावरील निवडक समित्यांकडून प्राप्त होणारे प्रस्ताव, महानगरपालिका, सर्वोतकृष्ट कल्पनांतर्गत शासकीय संस्था, शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी या पुरस्कारांचा समावेश होता.

यानुसार राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणारे प्रस्ताव या गटात विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांना तिसऱ्या क्रमांकाचे चार लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या कार्यालयाने कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतींचा अवंलब करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी ‘उभारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली बसवून ऊर्जेची बचत करीत पर्यावरणाचे संवर्धन, वॉटर हार्वेस्टिंगचा वापर, कार्यालयास हरीत इमारतीचे प्रमाणपत्र, मोफत सातबारा उताऱ्याचे वाटप आदी कार्यक्रम राबविले आहेत.

सर्व कार्यालयीन मुख्यालय स्तरावर राज्यस्तरीय पुरस्कार

क्रमांक कार्यालयाचे नाव व उपक्रम पारितोषिक
तृतीय विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक

उपक्रम: कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुंबांच्या मदतीकरिता ‘उभारी’ कार्यक्रम, पर्यावरण पूरक सौरउर्जा प्रणाली बसवून उर्जेची बचत, वॉटर हार्वेस्टींगचा वापर, कार्यालयास ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र, मोफत 7/12 वाटप

रोख रु. 4,00,000/-

(रु. चार लाख फक्त),

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

 

विभागीय स्तरांवरील निवड समित्यांकडून शिफारस होणारे प्रस्ताव

क्रमांक कार्यालयाचे नाव व उपक्रम पारितोषिक
प्रथम पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर

उपक्रम: जिल्ह्यातील पोलीस ठाणे पासून पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये दैनंदिन टपालाचे वितरण करण्यासाठी ई-टपाल प्रणाली विकसित करणे.

रोख रु. 10,00,000/-

(रु. दहा लाख फक्त)

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

तृतीय पंचायत समिती, राहाता, अहमदनगर

उपक्रम: नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील समस्यांचे थेट निराकरण, कोरोना कालावधीत मदत, बचत गट विक्री व प्रदर्शन कार्यक्रम, घरकुल प्रकल्प सक्षमपणे राबविणे.

रोख रु. 4,00,000/-

(रु. चार लाख फक्त),

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

 

सर्वोकृष्ट कल्पना/ शासकीय संस्था

क्रमांक कार्यालयाचे नांव व उपक्रम पारितोषिक
प्रथम तहसिल कार्यालय, तळोदा, नंदुरबार

उपक्रम: उपलब्ध जागेचा पर्याप्त व सुनियोजितपणे वापर करुन तहसिल कार्यालयात वाहनतळ तयार करुन पार्किंगसाठी शिस्त लावणे

रोख रु. 50,000/-

(रु. पन्नास हजार फक्त),

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

द्वितीय तहसिल कार्यालय, नवापूर, नंदुरबार

उपक्रम: अभिलेख कक्षाचे नुतनीकरण करणे

रोख रु. 30,000/-

(रु. तीस हजार फक्त),

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

 

शासकीय अधिकारी

क्रमांक कार्यालयाचे नांव व उपक्रम पारितोषिक
प्रथम डॉ. राजेंद्र बी. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर

उपक्रम: शेतकरी व नागरिकांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याकरिता जिल्ह्यात ‘‘महसुल विजय सप्तपदी’’ अभियान राबविणे.

रोख रु. 50,000/-

(रु. पन्नास हजार फक्त),

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

द्वितीय श्री. अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगांव

उपक्रम: 7/12 उताऱ्यावरील प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित कालबाह्य फेरफार नोंदी वगळण्याची धडक मोहिम राबवून अद्यायावत अभिलेख तयार करणे.

रोख रु. 30,000/-

(रु. तीस हजार फक्त),

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

 

शासकीय कर्मचारी

क्रमांक कार्यालयाचे नांव व उपक्रम पारितोषिक
प्रथम श्री. अजय राजाराम लोखंडे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, भडगांव नगरपरिषद, भडगांव, जळगांव

उपक्रम: न्यायालयीन निर्णय तसेच नगरपरिषदेमार्फत आकारल्या जाणाऱ्या करांबाबत सोप्या भाषेत व व्यंगचित्रांच्या माध्यमातून फोटोफ्रेमद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करणे.

रोख रु. 50,000/-

(रु. पन्नास हजार फक्त),

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

द्वितीय श्री. निशिकांत सुर्यकांत पाटील, तलाठी, पारोळा शहर, तलाठी कार्यालय, पारोळा, जळगांव

उपक्रम: स्वखर्चाने व लोकसहभागातून तलाठी कार्यालय नुतनीकरण व सुसज्ज करणे.

रोख रु. 30,000/-

(रु. तीस हजार फक्त),

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र

 

 

 

 

पुरस्कार प्राप्त सर्वांचे अभिनंदन:

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये नाशिक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे नाशिक विभागातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे पुढील वर्षी नाशिक विभागातील पुरस्कार विजेत्यांची संख्या अधिक राहील, असा मला विश्वास आहे.

– राधाकृष्ण गमे, आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक.


Back to top button
Don`t copy text!