नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेश हेंद्रे यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 2 एप्रिल 2025। कोळकी । फलटण येथील श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेश हरिभाऊ हेंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तर उपाध्यक्षपदी मिलिंद हरिदास गाटे, सचिवपदी राजेंद्र रामदास कुमठेकर यांची निवड झाली.

येथील विठ्ठल मंदिरामध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या निवडी जाहीर करण्यात आल्या. सदस्यपदी रामचंद्र गानबोटे, सुनील पोरे, राहुल जामदार, दिगंबर कुमठेकर, विशाल मोहोटकर, मृणाल पोरे, मंगेश पोरे यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकार्‍यांचे समाजातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!