जिल्हा माहिती कार्यालयाच्या वेबचर्चेत कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । नागपूर । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांची ‘नागपूर जिल्ह्यातील जलसाठे व पावसाळ्यातील व्यवस्थापन’ या विषयावर उद्या विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे.

ही मुलाखत  https://youtu.be/2tvFirwi1B8 या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 14 जुलै 2022 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रसारीत होईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. दुपारी 4.30 वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल. यासाठी वेबेक्स लिंक जाहीर केली जाणार आहे.

‘नागपूर जिल्ह्यातील जलसाठे व पावसाळ्यातील व्यवस्थापन’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे  या कार्यक्रमातून करणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Back to top button
Don`t copy text!