दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण | फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विष्णुपंत गाडे यांचे सुपुत्र राजेंद्र विष्णुपंत गाडे व होळ विकास सोसायटीचे माजी चेअरमन पांडुरंग भोसले यांनी राजे गटात प्रवेश केला असून या प्रवेशदरमान्य विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी “पाटील! तुम्ही भलत्या भानगडीत पडू नका!; तुम्ही सुखात रहा” असे आवाहन जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील यांना उद्देशून केले आहे.
साखर कामगारांच्या भविष्यासाठी सहकार्य करा. तुम्ही जर सहकार्य केले तर हा दत्त इंडिया साखर कारखाना मला २० हजाराच्या गळीताकडे घेऊन जायचा आहे. त्यासाठी पाटील तुम्ही साथ द्या! पाटील तुम्हाला जर कारखाना पाहिजे असेल तर नवीन साखर कारखाना काढा नाहीतर दुसरे काहीतरी करा उगीच अधून मधून डिवचण्याचे काम करू नका. साखरवाडीला कशाचा शाप लागला आहे. हे अजून तरी मला कळत नाही. साखरवाडीची साखर अजून गोड काय काही होत नाही. तेव्हा राजू गाडे व पांडुरंग भोसले यांनी साखर गोड होण्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या पुढील भावी पिढीच्या भविष्यासाठी काळजी घ्यावी. रामराजे व प्रल्हादराव साळुंखे पाटलांचे भांडण हे किती दिवसाचे असणार आहे ? तेव्हा सर्वांना एकच विनंती आहे की; सर्वांनी एक होऊन साखरवाडीच्या विकासाकरता एकत्र येऊन सहकार्य करा; असे मत यावेळी श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.